फडणवीसांना नोटीस येताच प्रवीण दरेकरांचा महाविकास आघाडी सरकारवर आरोप

Published by
Ahmednagarlive24 Office

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) फोन टॅपिंग (Phone tapping) प्रकरणात नोटीस बजावण्यात आली आहे.

त्या संदर्भात उद्या ११ वाजता बीकेसीच्या सायबर पोलीस (Police) स्टेशनला फडणवीस यांना बोलवण्यात आले आहे. त्यामुळे उद्या काय होणार याप्रकरणी राजकीय वर्तुळात चर्च रंगत आहे.

या प्रकरणावर बोलताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी फडणवीस यांच्यावर झालेले सर्व आरोप फेटाळत हे महाविकास आघाडीचे कारस्थान असल्याचे सांगितले आहे.

दरेकर म्हणाले, “देवेंद्र फडणवीसांनी विधानभवनात भांडाफोड केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार हललं आहे. महाविकास आघाडीचे नेते अस्वस्थ आहेत. त्यामुळे फडणवीसांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय.

तसेच फडणवीस कुठल्याच अवैध कामात सापडत नाहीत. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करू शकत नाही म्हणून त्यांना ही नोटीस देण्यात आली आहे”,असे बोलत त्यांनी फडणवीस यांच्यावर झालेल्या आरोपांचे समर्थन केले आहे.

दरम्यान, महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारच्या गृहमंत्रालयातील महाघोटाळ्यासंदर्भात मला अशाच चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. मी पोलिसांना पूर्ण सहकार्य करणार आहे. उद्या बीकेसी येथील पोलीसांसमोर मी हजर होईन, त्यांच्या प्रश्नांना योग्य ती उत्तरे देईन, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office