अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-देशात कोरोनाने कहर केला आहे. यामुळे देशात सर्वत्रच लसीकरण मोहीम अत्यंत वेगाने सुरु आहे.
यातच देशात 16 जानेवारीपासून जाहीर करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याला 1 मे पासून सुरुवात होत आहे.
यामध्ये 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण केलं जाणार आहे. या लसीकरण मोहिमेची नोंदणी 28 एप्रिलपासून सुरू होणार आहे. केंद्र सरकारने याबाबत माहिती दिली आहे.
लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात ज्या नागरिकांना लस घ्यायची आहे त्यासाठी २४ एप्रिलपासून नोंदणी प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
त्यासाठी आधीप्रमाणेच CoWin अँपवर ही नोंदणी करता येणार आहे. नोंदणी करण्याची प्रक्रिया आधीप्रमाणेच असेल, असं केंद्रीय आरोग्य प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
कशी कराल नोंदणी? :-
कशी असेल प्रक्रिया? :- नोंदणी केलेल्या व्यक्तीला त्यांच्या मोबाईक क्रमांकावर एक SMS येईल. पहिला मेसेज येईल तेव्हा व्यक्तीला रजिस्ट्रेशन कंन्फर्मेशन बद्दल सांगण्यात येईल.
त्यानंतर दुसऱ्या मेसेजमध्ये कंन्फर्म तारीख, वेळ आणि लसीकरण केंद्राबद्दल कळवले जाईल.
आता लस घेतल्यानंतर पुन्हा एकदा तिसऱ्या वेळेस त्या संदर्भातील एसएमएस तुम्हाला मिळेल. पहिला डोस घेतल्यानंतर ३० मिनिटे तुम्हाला निगराणीखाली ठेवले जाईल.