Pregnancy Tips: सावधान ! खाण्याबाबतची ‘ही’ बेपर्वाई येऊ शकते आई बनण्याच्या आड ; जाणून घ्या कोणत्या गोष्टी टाळाव्यात

Pregnancy Tips: आई होणे ही कोणत्याही स्त्रीसाठी खूप महत्वाचे असते मात्र काही वेळा प्रयत्न करूनही स्त्रिया गर्भधारणा करू शकत नाहीत. यासाठी गर्भधारणेदरम्यान गर्भाची काळजी घेणे खूप आवश्यक असते तसेच त्याच्या विकासासाठी अनुकूल वातावरण देखील तितकेच महत्वाचे आहे.

म्हणून या काळात  चांगला आहार घेतला पाहिजे.  चांगला आहार स्त्री आणि तिच्या पोटातील बाळाला निरोगी ठेवतो. कारण कधीकधी अनियमित आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे महिलांच्या प्रजनन क्षमतेवर वाईट परिणाम होतो. अशा परिस्थितीत कोणता आहार तुमच्यासाठी चांगला असेल ते जाणून घ्या.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

जास्त कार्बयुक्त पदार्थ हानी पोहोचवू शकतात

पास्ता, तृणधान्ये, ब्रेड, बटाटे इत्यादी उच्च कार्बयुक्त पदार्थ खाणे प्रजननक्षमतेसाठी हानिकारक ठरू शकते. आपल्या शरीराला ऊर्जेसाठी कार्बोहायड्रेट्सची गरज असली तरी त्यात असलेली साखर तुटते. यामुळे रक्तातील साखर वाढू शकते, ज्यामुळे जळजळ होऊ शकते आणि संप्रेरक संतुलनावर परिणाम होतो. हे ओव्हुलेशन रोखू शकते आणि प्रजनन क्षमतेवर प्रतिकूल परिणाम करू शकते. त्यामुळे साध्या कार्ब ऐवजी कॉम्प्लेक्स कार्ब घ्या. तसेच कर्बोदकांसोबत फायबरयुक्त अन्न खा.

कमी चरबीयुक्त

दुग्धजन्य पदार्थांमुळे वंध्यत्व येऊ शकते संशोधनात असे दिसून आले आहे की कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ अनेकदा स्त्रियांमध्ये वंध्यत्वाचे कारण बनू शकतात. जेव्हा दुग्धजन्य पदार्थांमधून चरबी काढून टाकली जाते, तेव्हा ते स्त्रियांमध्ये PCOS आणि वंध्यत्वाचा धोका वाढवते.

जास्त साखरयुक्त पदार्थ खाणे टाळा

जर तुम्हाला गर्भधारणा करायची असेल तर तुम्ही जास्त साखरेचे पदार्थ टाळणे फार महत्वाचे आहे. साखरेमुळे जळजळ आणि ग्लायकेशन होते. त्यामुळे आपल्या अवयवांचे नुकसान होते. सेल्सचेही नुकसान होते.

सोडासह एनर्जी ड्रिंक्समध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. संशोधनात असे दिसून आले आहे की साखरयुक्त पेये केवळ महिलाच नव्हे तर पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवरही विपरित परिणाम करतात. त्यामुळे महिलांना गर्भधारणा होण्यास खूप त्रास होतो.

हे पण वाचा :-   Business Idea: घरी बसून ‘या’ ऑनलाइन व्यवसायातून चमकू शकते नशीब ! होणार दरमहा लाखोंची कमाई ; जाणून घ्या संपूर्ण माहिती