रेखा जरे हत्याकांड प्रकरणात पोलिसांकडून दोषारोपपत्राची तयारी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :-रेखा जरे यांची 30 नोव्हेंबरला पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात हत्या झाली. या हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी सुरूवातील पाच आरोपींना अटक केली होती.

याप्रकाणातील मुख्य आरोपी बोठेला पोलिसांनी अटक केली. जरे हत्याकांड प्रकरणातील पुरवणी दोषारोपपत्राची तयारी पोलिसांनी पूर्ण केली आहे.

या आठवड्याच्या शेवटी हे पुरवणी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे. अशी माहिती तपासी अधिकारी पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी दिली.

दरम्यान हत्याकांडातील मुख्य आरोपी बोठेला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे तपास केला. नेमकी ही घटना कशी घडली? बोठे याने जरे यांची हत्या का केली? याची माहिती बोठे याने पोलिसांना दिली आहे.

बोठे याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी परिस्थितीजन्य पुराव्याचा शोध घेतला आहे. तसेच त्याला मदत करणारे अन्य व्यक्तींचे जाब- जबाब पोलिसांनी नोंदविले आहे.

या सर्व बाबीचा उल्लेख पुरवणी दोषारोपपत्रामध्ये असणार आहे. दरम्यान बोठे पसार झाल्यानंतर तो हैदराबाद येथे लपला होता.

त्याठिकाणी त्याला मदत करणारा वकिल जनार्दन अकुला, राजशेखर अजय चाकाली, शेख इस्माईल शेख अली, अब्दुल रहमान अब्दुल आरीफ, पी अनंतलक्ष्मी व्यंकटम सुब्बाचारी यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावरही दोषारोप ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अहमदनगर लाईव्ह 24