अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2021 :- कोरोना काळात ऑक्सिजन, रेमडेसिविरसह इतर आवश्यक औषधांच्या टंचाईबाबत सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी सुमारे पाच तास सुनावणी झाली. न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि एम. आर. शहा यांच्या पीठाने केंद्राला सांगितले की, कोरोनाची तिसरी लाटही येऊ शकते.
म्हणून आपण आतापासूनच तयारी केली तर त्याला तोंड देता येईल. विकत घेतलेला ऑक्सिजन रुग्णालयांना द्यावा लागेल. तो राज्यांना वितरित करण्यासाठी नसून रुग्णालयांना दिला जातो का, याकडे लक्ष द्यायला हवे.
सुनावणीच्या वेळी केंद्राच्या वतीने सांगण्यात आले की, न्यायालयाच्या आदेशावरून दिल्लीला ७०० ऐवजी ७३० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला. मात्र हा ऑक्सिजन रुग्णालयांपर्यंत पोहोचवण्यासाठी वाहतुकीची पुरेशी व्यवस्था नाही.
पीठाने सांगितले की, आम्हाला हे प्रकरण दिल्लीपुरते करायचे नाही, तर प्रत्येक बाब समजून घेत तोडगा काढायचा आहे. केंद्राने ऑक्सिजन पुरवठ्याच्या फॉर्म्युल्यावर पुनर्विचार करावा. दऱम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी सांगितले की,
पहिल्यांदाच बुधवारी ७३० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला. राज्याला आधीच ७०० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवला असता तर अनेकांचे जीव वाचवले असते. ऑक्सिजन नसल्याने खाटा कमी करणाऱ्या रुग्णालयांना खाटा वाढवण्याची विनंतीही त्यांनी केली.