अहमदनगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी! घरांसह शाळेवरील पत्रे उडाले : फळबागा व कांद्याचे नुकसान…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- आज दुपारनंतर श्रीगोंदा व कर्जत तालुक्यातील मिरजगाव परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.

दुपारी ४ वाजेच्या दरम्यान विजेच्या कडकडाट वादळी वाऱ्यासह सुरू झालेल्या पावसामुळे या परिसरातील शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली.

मिरजगाव परिसरातील टाकळी खंडेश्वरी, चांदे बुद्रुक, गुरवपिंप्री, मांदळी, तिखी, रवळगाव, बाभूळगाव, माहिजळगाव, पाटेवाडी, नागलवाडी, नागापूर यासह अनेक ठिकाणी फळबागा तसेच शेतातील काढणीला आलेल्या कांद्याची तसेच लिंबू पिकांचे वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे नुकसान झाले आहे.

त्याचसोबत परिसरात वादळी वाऱ्यामुळे काही भागातील शेतकऱ्यांच्या घरावरील पत्रे उडाले तर कोकणगाव ज्योतिबावाडी परिसरातील शाळेचे देखील पत्रे उडाले आहेत.

तर श्रीगोंदा तालुक्यात गुरूवार पासून सलग तीन दिवस तालुक्यातील आढळगाव, मांडवगण, घोडेगाव, बेलवंडीसह शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. यात आंबा, लिंबू, या फळ उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24