अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये काल कांद्याची 66 हजार 598 गोण्या आवक झाली.
भाव 2200 रुपयांपर्यंत निघाले. मंगळवारच्या तुलनेत आवकेत जवळपास 23 हजार गोण्या घट झाली. सोमवारी 89 हजार गोण्या एवढ्या प्रचंड आवक झाली होती. काल एक नंबरच्या कांद्याला 1900 ते 2000 रुपये भाव मिळाला.
दोन नंबरच्या कांद्याला 1700 ते 1900 रुपये तर तीन नंबरच्या कांद्याला 400 ते 500 रुपये भाव मिळाला. दोन-तीन वक्कलांना 2200 रुपयांपर्यंत भाव मिळाला.
शनिवारी व रविवारी विकएन्ड लॉकडाऊन जाहीर झालेला असल्याने शनिवारचे कांदा लिलावआता बंद ठेवण्यात आले आहेत.
आठवड्यात केवळ दोनच दिवस लिलाव होत आहेत. करोना नियमामुळे सोमवारच्या दिवशी दुपारी चारपर्यंत आवक घेतली जात असून त्याचे लिलाव मंगळवारी केले जात आहेत.