अमरधाम मधील कर्मचार्‍यांचा गौरव जीवाची पर्वा न करता कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार केल्याने कोरोना योध्दा सन्मान प्रदान

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 14  जुलै 2021 :-  कोरोना महामारीच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेमध्ये जीवाची पर्वा न करता कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणार्‍या

नालेगाव अमरधाम मधील कर्मचार्‍यांचा छत्रपती मराठा साम्राज्य (सीएमएस) अहमदनगर परिवाराच्या वतीने कोरोना योध्दा सन्मानाने गौरविण्यात आले.

यावेळी संदीप नवसुपे, वसंत आभाळे, आजिनाथ मोकाटे, मनोज सोनवणे, संजय शिंदे, प्रमोद काकडे, शुभम रक्ताटे, रोहिणी वाघमारे, विजय शेटे, भाग्येश सव्वाशे, बाळासाहेब भवर, अशोक बेरड, सुधीर बेरड, मेजर सुनील वाघ,

चेतन भगत, सागर शिरसाठ, बंटी कारंडे आदी ग्रुपचे सदस्य उपस्थित होते. कोरोना महामारीत अमरधाम मधील कर्मचारी जीवाची पर्वा न करता दिवस-रात्र कोरोनाने मृत पावलेल्या व्यक्तींचे अंत्यसंस्कार करत होते.

कोरोनाने मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य व नातेवाईक सुद्धा मृतदेहा जवळ येत नव्हते, अशा परिस्थितीमध्ये अमरधाम मधील कर्मचारी कर्तव्य बजावून कोरोना मृतदेहावर अंत्यसंस्कार करत होते.

अमरधाम मधील कर्मचार्‍यांनी दिलेली सेवा धाडस व त्यागाचे प्रतिक असल्याचे छत्रपती मराठा साम्राज्य (सीएमएस) अहमदनगर परिवाराच्या वतीने स्पष्ट करुन त्यांना कोरोना योध्दा स्नमानाने गौरविण्यात आले.

नालेगाव अमरधाम मधील स्वप्नील कुर्‍हे व त्यांची टीम असे पंधरा व महापालिकेचे अशोक जावळे, गोरख चांदणे या दोन कर्मचार्‍यांना कोरोना योद्धाचे सन्मानपत्र, पुष्पगुच्छ, शाल आणि मिठाई बॉक्स देऊन सत्कार करण्यात आला.

तर कर्मचार्‍यांच्या आरोग्याची काळजी म्हणून त्यांना फेस मास्क, सॅनिटायजर व हॅन्डग्लोजचे वाटप करण्यात आले.

या पध्दतीने सेवा देणार्‍या महाराष्ट्रातील सर्व अमरधाममधील कर्मचार्‍यांना छत्रपती मराठा साम्राज्य (सीएमएस) च्या वतीने कोरोना योध्दा म्हणून गौरव करण्यात आला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24