ताज्या बातम्या

पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, ‘ते’ वादग्रस्त तीन कृषी कायदे मागे घेणार

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2021 :-   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वात मोठी घोषणा केली आहे. तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. मी देशवासियांची क्षमा मागतो.

आमच्या तपस्येतच काही कमी राहिली असेल. काही शेतकऱ्यांना आम्ही या गोष्टी समजावू शकलो नाही. आम्ही तिन्ही कृषी कायदे मागे घेत आहोत, असं मोदींनी म्हटलं आहे.

या, नवी सुरुवात करुया,असं म्हणत मोदींना शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे. या महिन्याअखेरीस सुरु होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात तीनही कृषी कायदे माघारी घेण्याची संवैधानिक प्रक्रिया सुरू केली जाईल, असं आश्वासनही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं आहे. नेमके काय म्हणाले आहे मोदी?

जाणून घ्या देशात लहान शेतकऱ्यांना ताकद मिळावी यासाठी कृषी कायदे लागू करण्यात आले. अनेक वर्षांपासून हे शेतकरी ही मागणी करत होते. याआधीच्या सरकारने यावर चर्चा केली होती. यावेळी चर्चा करून हे कायदे लागू केले गेले. अनेक शेतकरी संघटनांनी या कायद्याचे स्वागत केले.

ज्यांनी स्वागत केले त्यांचे मी आभार मानतो. आमचे सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी देशाच्या कृषी क्षेत्राच्या हिताने काम करत आहे. गावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी निष्ठेने, शेतकऱ्यांसाठी समर्पणाने हे कायदे आणले. पण तरीही काही शेतकऱ्यांना हे कायदे समजले नाही.

कृषी तज्ज्ञांनी त्या शेतकऱ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. त्यांचे तर्क समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांचा ज्यावर आक्षेप होता ते बदलण्याची तयारी दाखवली.

कायदे निलंबित करण्याचा प्रस्तावही मांडला असे मोदी म्हणाले. देशवासियांची माफी मागून मला हे म्हणावं वाटतं की, आमच्या तपस्येत काही उणीव राहिली असावी.

दिव्याच्या प्रकाशाचं महत्त्व आम्ही समजून सांगू शकलो नाही. कोणालाही दोष देण्यात अर्थ नाही. आम्ही तिन्ही कृषी कायदे मागे घेणार आहे. याची संवैधानिक प्रक्रिया सुरु करणार असल्याचे मोदींनी सांगितले.

Ahmednagarlive24 Office