अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी इथे श्री काशी विश्वनाथ धामचे उदघाटनकरणार आहेत. खरं तर उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकांचा हंगाम सुरु आहे. त्यापार्श्वभूमीवर नेत्यांचे दौरे वाढलेले आहेत.(PM Narendra Modi)
पण पंतप्रधान मोदींचा हा दौरा फक्त निवडणूक दौरा म्हणून पहाता येणार नाही. तो काहीसा खास आहे. कारण तमाम हिंदूंचं श्रद्धास्थान असलेल्या वाराणसीचा कायापालट गेल्या काही काळात केला गेलाय.
त्यातल्या अनेक प्रोजेक्टचा लोकार्पण सोहळा आयोगीत केला गेलाय. पंतप्रधान मोदी त्याचं उदघाटन करणार आहेत. श्री काशी विश्वनाथ मंदिराला गंगा नदीच्या सर्व किनाऱ्यांशी जोडण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न या प्रकल्पामुळे प्रत्यक्षात साकार होत आहे.
यावेळी १२ राज्यांचे मुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदी सोमवारी सकाळी वाराणसी विमानतळावर पोहोचतील आणि त्यानंतर हेलिकॉप्टरने संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठाच्या परिसरात जातील.
त्यानंतर ते काल भैरव मंदिराकडे प्रस्तान करतील आणि नंतर कॉरिडॉरला लागून असलेल्या घाटावर जलमार्गाने जातील. पंतप्रधान मोदी घाटातून काशी विश्वनाथ धाम येथे पोहोचतील आणि त्यानंतर कॉरिडॉरचे उद्घाटन करतील.
त्यानंतर नवीन कॉरिडॉरच्या आवारात फेरफटका मारून उभारलेल्या इमारतींची पाहणी करतील. हा कार्यक्रम सुमारे दोन-तीन तास चालणार आहे.