पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याशी संवाद साधणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरूवार (२० मे) रोजी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव यापार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी थेट जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

दरम्यान या आढावा बैठकीसाठी देशातील ५६ जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांचा समावेश आहे. विशेषबाब म्हणजे यामध्ये अहमदनगर जिल्ह्याचा देखील समावेश आहे.

यामुळे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याशी संवाद साधणार आहे.

या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिकांचे आयुक्त सहभागी होणार आहेत.

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांचा समावेश अहमदनगर, सोलापूर, चंद्रपूर, नाशिक, सातारा, बुलढाणा, कोल्हापूर, सांगली, अमरावती, वर्धा, पालघर, उस्मानाबाद, जालना, लातूर, नागपूर, परभणी व बीड.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24