५० टक्‍के फी माफ करण्‍याच्‍या निर्णयामागे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्‍या विचारांचीच प्रेरणा – आ.राधाकृष्‍ण विखे पाटील

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :- मराठा, ओबीसी समाजातील विद्यार्थ्‍यांसाठी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेने या शैक्षणिक वर्षासाठी ५० टक्‍के फी माफ करण्‍याच्‍या निर्णयामागे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्‍या विचारांचीच प्रेरणा असल्‍याचे प्रतिपादन आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले.

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेने या शैक्षणिक वर्षात व्‍यवसायीक महाविद्यालयात प्रवेश घेणा-या शिर्डी विधानसभा मतदार संघातील मराठा आणि ओबीसी समाजातील विद्यार्थ्‍यांकरीता ५० टक्‍के फी माफ करण्‍याचा निर्णय घेतल्‍याबद्दल भारतीय जनता पक्षाच्‍या ओबीसी आघाडीच्‍या वतीने आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांचा सत्‍कार करण्‍यात आला.

याप्रसंगी ओबीसी आघाडीचे प्रदेश सचिव नंदकुमार जेजूरकर, प्रदेशाचे उपाध्‍यक्ष प्रकाश चित्‍ते, जिल्‍हाध्‍यक्ष बाळासाहेब गाडेकर, शिर्डीचे नगराध्‍यक्ष शिवाजीराव गोंदकर, भाजपाचे उपाध्‍यक्ष नितीन कापसे, भाजयुमोचे तालुका अध्‍यक्ष सतिष बावके, किसान आघाडीचे तालुका प्रमुख बाळासाहेब डांगे, महिला जिल्‍हाध्‍यक्षा पुष्‍पलता हरिदास,

कामगार आघाडीचे प्रदेश उपाध्‍यक्ष रविंद्र चव्‍हाण, श्रीरामपूर बाजार समितीचे संचालक मनोज हिवराळे यांच्‍यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. सत्‍काराबद्दल कृतज्ञता व्‍यक्‍त करुन आ.विखे पाटील म्‍हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली केंद्र सरकारने या देशातील सामान्‍यातील सामान्‍य माणसाला विकासाच्‍या मुख्‍य प्रवाहात आणण्‍यासाठी निर्णय केले आहेत.

३४ वर्षांनंतर या देशाला नवीन शैक्षणिक धोरण मिळाले. आज या निर्णयाला एक वर्ष पूर्ण होत आहे. नव्‍या शैक्षणिक धोरणातही प्रत्‍येक समाज घटकातील विद्यार्थी हा शिक्षणाच्‍या प्रवाहात यावा हाच विचार शैक्षणिक धोरणात आहे. पंतप्रधानांच्‍या प्रेरणादायी विचारातून प्रवरा संस्‍थेच्‍या माध्‍यमातून मराठा, ओबीस समाजातील विद्यार्थ्‍यांसाठी फी माफ करण्‍याचा निर्णय केला असल्‍याचे त्‍यांनी आवर्जुन नमुद केले.

या निर्णयाबाबत राज्‍यातील सर्व खासदार, आमदारांना आपण पत्र पाठवून त्‍यांनीही त्‍यांच्‍या मतदार संघात असे निर्णय करण्‍याबाबत विनंती केली असल्‍याची माहीती त्‍यांनी यावेळी दिली. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सबका साथ सबका विकास या घोषणेतूनच संपूर्ण देशवासियांचा विश्‍वास सार्थ ठरविला आहे.

मागील सात वर्षात या देशाला पुढे घेवून जाण्‍यासाठी दुरदृष्‍टीतून केंद्र सरकार करीत असलेल्‍या निर्णयांमुळेच राष्‍ट्रहिताबरोबरच सामाजिक‍ हित जोपासले जात आहे. कोव्‍हीड संकटातही या देशाला वाचविण्‍यासाठी पंतप्रधानांनी केलेले निर्णय हे सर्वच समाज घटकांच्‍या हिताचे ठरले. आज देशात ४३ कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. महाराष्‍ट्रातही ४ कोटी लोकांचे पूर्ण झाले.

राज्‍यातील मंत्री लसीकरणाचे श्रेय घेत असले तरी, हे लसीकरण केवळ मादीजींच्‍या निर्णयामुळे पूर्ण होवू शकले हेच सत्‍य असल्‍याचे आ.विखे पाटील यांनी ठामपणे सांगितले. याप्रसंगी प्रदेश उपाध्‍यक्ष प्रकाश चित्‍ते,नितीन कापसे, बाळासाहेब गाडेकर, महिला जिल्‍हाध्‍यक्षा पुष्‍पलता हरिदास यांची भाषणे झाली. या कार्यक्रमाच्‍या निमित्‍ताने बांधकाम कामगारांसाठी असलेल्‍या योजनेचे कार्ड लाभार्थी सुपूर्त करण्‍यात आले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24