प्रधानमंत्री पीक विमा योजनेस 23 जुलैपर्यंत मुदतवाढ

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :- प्रधानमंत्री पीक विमा योजनेला मुदतवाढ मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी राज्य सरकारनं केली होती.

कृषीमंत्री दादा भुसे यांनी त्यांसदर्भात माहिती दिली होती तर, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी महाराष्ट्र सरकारनं तसा प्रस्ताव द्यावा, मुदत वाढवून देऊ, असं म्हटलं होतं.

राज्य सरकारनं केंद्र सरकारला पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठीची मुदत वाढवण्यासाठीचा प्रस्ताव दिला आणि अखेर केंद्र सरकारनं राज्याची विनंती मान्य करत मुदत 23 जुलैपर्यंत वाढवली आहे.

पीक विमा भरण्यास 15 जुलै अंतिम तारीख होती मात्र अनेक शेतकऱ्यांचा विमा न भरला गेल्याने 8 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

शेतकरी त्यांचं खातं असलेल्या बँकेच्या शाखा, प्राथमिक कृषी पतपुरठाव संस्था, पीक विमा पोर्टल आणि आपले सरकार सुविधा केंद्र या ठिकाणी पीक विम्याचा हप्ता भरु शकतात.

कृषीमंत्री दादा भुसे यांनी पीक विमा योजनेसाठी 15 जुलैपर्यंत सुमारे 46 लाख शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत असे सांगितले.

राज्यातील काही भागात लांबलेला पाऊस, कोरोना प्रतिबंधासाठी असलेले निर्बंध यामुळे शेतकऱ्यांना मुदतीत विमा हप्ता भरणे शक्य झाले नाही.

त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होता यावे यासाठी सर्व बाबींचा विचार करून केंद्र शासनाने २३ जुलै पर्यंत योजनेस मुदतवाढ द्यावी, अशी मागणी राज्यानं केंद्राकडं केली होती.

अहमदनगर लाईव्ह 24