Priyanka Chopra Birthday : अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) हिने बॉलीवूडसोबतच (Bollywood) हॉलिवूडमध्येही आपल्या दमदार अभिनयाची (Acting) एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रियांका चोप्रा आज तिचा 40 वा वाढदिवस साजरा करत आहे.(Priyanka Chopra Birthday)
17 वर्षात ‘मिस वर्ल्ड’ बनली होती
प्रियांका चोप्राने वयाच्या 17 व्या वर्षी ‘मिस वर्ल्ड’चा (Miss World) किताब पटकावला होता. हा सन्मान मिळवणाऱ्या त्या पाचव्या भारतीय (Indian) होत्या. ही स्पर्धा जिंकल्याबद्दल प्रियांकाला एक लाख डॉलर्स मिळाले. यानंतर प्रियांका फिल्मी दुनियेकडे वळली.
प्रियांका पहिल्यांदा तमिळ (Tamil) चित्रपटात दिसली होती. बॉलीवूडमधील तिचा पहिला चित्रपट ‘हमराज’ होता. त्यानंतर ती एकापेक्षा एक चित्रपटात दिसली. प्रियांकाचा चित्रपट प्रवास अप्रतिम आहे. प्रियांकाने बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमध्येही वेगळे स्थान निर्माण केले आहे.
प्रियांकाने आपल्या हॉलिवूड करिअरची सुरुवात अमेरिकन टीव्ही मालिका ‘क्वांटिको’मधून केली होती. या शोसाठी प्रियांकाला दोनदा ‘पीपल्स चॉईस अवॉर्ड’ मिळाला होता.
निक जोनासशी लग्न केले आहे
प्रियांका चोप्राने 2018 साली निक जोनाससोबत जोधपूरच्या उम्मेद भवन येथे हिंदू आणि ख्रिश्चन रितीरिवाजानुसार शाही विवाह केला होता. निक जोनास हा अमेरिकन गायक, लेखक, अभिनेता आणि रेकॉर्ड निर्माता आहे.
प्रियांका आणि निक जोनास यांची संपत्ती एकत्र केली तर या जोडप्याकडे 734 कोटी रुपयांची संपत्ती आहे. प्रियांका चोप्रा अनेक मोठ्या उत्पादनांची ब्रँड ॲम्बेसेडर देखील आहे. ती तिच्या पतीसोबत लॉस एंजेलिसमध्ये राहते.
प्रियांका या रेस्टॉरंटची मालकीण आहे
प्रियांकाचे स्वतःचे पर्पल पेबल पिक्चर्स (Purple Pebble Pictures) प्रोडक्शन हाऊस देखील आहे. या प्रॉडक्शन हाऊसच्या अंतर्गत व्हेंटिलेटर, सर्व्हन, पाहुना, फायरबँड, पाणी, द स्काय इज पिंक, द व्हाईट टायगर यांसारख्या उत्कृष्ट चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे.
प्रियांकाने हेअरकेअर प्रोडक्ट ॲनोमलीही लॉन्च केले आहे. याशिवाय त्यांचा रेस्टॉरंटचा व्यवसायही आहे.