अहमदनगर Live24 टीम, 30 सप्टेंबर 2021 :- निद्रानाशाच्या समस्येत झोप येण्यात अडचण, मध्यरात्री झोपमोड, सकाळी लवकर जाग येणे वा गाढ झोप न लागणे हे प्रकार सामील आहेत.
निद्रानाश एक कठीण समस्या असून ज्याची अनेक कारणे असू शकतात. यापैकी काही कारणांचा संबंध आपल्या खाण्या-पिण्याशीही असू शकतो.
» सुधारा : –
जर आपण कॅफिनबाबत संवेनशील असाल तर रात्रीच्या जेवणानंतर एक कप कॉफी वा चहा प्याल्यानंतर आपल्याला उशीरापर्यंत झोप येणार नाही.
कोल्ड ड्रिंक्स प्याल्यामुळेही झोप येण्यास अडचण येते. अल्कोहोल झोपा संबंधित समस्या निर्माण करू शकते. याचे सेवन सुरू केल्यानंतर सुरुवातीला झोप येऊ शकते पण नंतर हळूहळू झोपेचा गाढपणा कमी होऊ लागतो आणि उठल्यानंतर थकवा जाणवेल.
अल्कोहोल आणि इतर पदार्थ झोपेची ती अवस्था दाबतात ज्याला तीव्र नेत्रगती म्हणतात. याच अवस्थेत व्यक्ती बहुतेक स्वप्ने पाहात असते. ठएचचा अवधी कमी झाल्यामुळे व्यक्ती रात्री वारंवार उठते व तिला आरामदायक झोप येत नाही.
यासाठी बिछान्यात जाण्यापूर्वी दोन तास आधी मद्य वा इतर कोणतेही अल्कोहोलिक पेय पिऊ नये. काहीजण झोपेच्या गोळ्या अल्कोहोलमध्ये टाकून पितात, पण असे कधीही करू नये. हे दोन्ही स्नायू प्रणाली वर दबाव टाकतात. जर हे दोन्ही एकत्र शरीरात गेले तर घातक ठरू शकते.
» हलके जेवण :-
रात्री आपण काय आणि किती खाता यावरही झोप अवलंबून असते. जड व भरपेट खाण्यामुळे व्यक्तीला त्वरित पेंग येते. पण यामुळे पचमनक्रियेचा काळ लांबतो व ज्यामुळे झोपेत बाधा येऊ शकते.
यासाठी भरपेट व जड जेवण दुपारीच करावे आणि रात्री हलका आहार घ्यावा. रात्रीच्या जेवणातून जास्तीत जास्त ५00 कॅलरी घ्याव्यात. तसेच जेवणात प्रोटीनचे प्रमाण जास्त असावे.
यामुळे रात्री भूक लागणार नाही. प्रोटीन पचायला कार्बोहायड्रेट च्या तुलनेत जास्त वेळ लागतो. मसालेदार व गॅसवर्धक खाद्यही झोपेसंबंधित समस्या निर्माण करू शकते.
जादा लसूण, मिरची व इतर मसाल्यांपासून बनवलेले जेवण घशात जळजळ व पचनात अडचण निर्माण करू शकते. सुगंधी जेवणही काहींमध्ये अस्वस्थतेचे कारण होऊ शकते.
गॅस उत्पन्न करणारे कोबी, फ्लॉवर, बीन्स, कांदा इ. पोटात समस्या उत्पन्न करू शकते. असे भराभर खाल्ल्यामुळे होऊ शकते.
» दुर्लक्ष नका :-
झोप न येण्याचे एक मुख्य कारण चिंताही आहे. जर एखाद्या कारणामुळे चिंताग्रस्त वा भीतीग्रस्त असाल तर आपल्याला झोप येणार नाही.
चिंता वा भीती दूर केल्यास आपल्याला झोप लागू शकेल. यासाठी दिवसा शारीरिक क्रिया वाढवून तणाव नियंत्रित करू शकता. यामुळे शरीर जास्त थकेल व रात्री चटकन झोप येईल.
» सायंकाळचा नाश्ता :-
सायंकाळी नाश्ता करणे हा झोपेच्या गोळीचा सर्वोत्तम पर्याय होऊ शकतो. अर्थात जर आपण सायंकाळी नाश्ता केला तर रात्री झोपेची गोळी खाणे टाळू शकता.
जास्त कार्बोहायडरेटचे खाद्य, फळे वा टोस्ट आणि जाम मेंदूत सेरोटोनिन नावाचे रसायन स्रवण्यास उपयुक्त असते. एक ग्लास गरम दूध पिणेही लाभदायक होऊ शकते.
दुधात प्रोटीन जास्त असते. त्यामुळे यातून सेंरेटोनिन निघण्याचे प्रमाण शक्य नसते पण हे आपला प्रभाव गरम द्रवाच्या रूपात दाखवा ज्यामुळे आपल्याला आराम मिळतो. झोप येण्यास मदत होते.
» मध्यरात्री रवाणे टाळा:-
आपली मध्यरात्री झोपमोड होत असेल व काही खाल्ल्याशिवाय पुन्हा झोप येत नसेल तर हे भुकेमुळे वा सवयीमुळे होऊ शकते. जे दिवसा अत्यंत कमी कॅलरी घेतात त्यांना रात्री असे होऊ शकते.
त्यांनी दिवसाचा आहार वाढवला तर हा दोष दूर् होईल. जर भूक लागली नसतानाही झोपमोड झाली तर खाण्याऐवजी एखादे पुस्तक वाचा वा ग्लासभर पाणी प्या. खाण्याच्या इच्छेकडे दुर्लक्ष करा.