व्यावसायिकाच्या जप्त केलेल्या मालमत्ता लिलावाची होणार कार्यवाही

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :-  गौणखनिजाचे अवैध उत्खननाबाबत तसंबंधितांकडून प्रलंबित असलेल्या दंडात्मक रकमेची वसुली करण्यासाठी जप्त स्थावर मालमत्ता लिलावाची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी देवदत्त केकाण यांनी दिली आहे.

दरम्यान याबाबत सविस्तर वृत्त असे कि, कपिल सतिषचंद्र अग्रवाल रा. पाथर्डी. ता. पाथर्डी, जि. अहमदनगर यांनी मौजे पाथर्डी येथील गट नं. 342 मध्ये 747 ब्रास इतक्या मुरुम या गौणखनिजाचे अवैध उत्खननाबाबत त्यांचेकडेस प्रलंबित असलेल्या

दंडात्मक रक्कम रुपये बावीस लाख एक्केचाळीस हजार रकमेच्या वसूलीसाठी मौजे पाथर्डी गट नं. 7/1/5 क्षेत्र 1.39.40 आर या स्थावर मालमत्ता जप्त करुनही प्रलंबित दंडात्मक रक्कमेची वसूली झालेली नाही.

या प्रकरणी जिल्हा खनिकर्म अधिकारी, अहमदनगर यांचेकडील दिनांक 28 जुन 2021 अन्वये कपिल सतिषचंद्र अग्रवाल रा. पाथर्डी यांचे जप्त स्थावर मालमत्तेचा लिलाव करणेबाबत उपविभागीय अधिकारी, पाथर्डी यांना कळवले होते.

त्या अनुषंगाने संबंधितांना नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान विक्रीसाठी निश्चित केलेल्या तारखेपूर्वी,

पुर्वोक्त रक्कम देण्यात आली नाही तर संबंधित मालमत्ता नवीन प्रशासकीय इमारत, तहसिल कार्यालय, पाथर्डी येथे दिनांक 16 जुलै 2021 रोजी सकाळी 11 वाजता जाहिर लिलावाव्दारे विकण्यात येईल. असे कळविण्यात आले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24