प्रा.डॉ.चंद्रकांत कडू पाटील यांना गुणवंत अध्यापक पुरस्कार प्राप्त

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:-पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इंन्स्ट्रयुमेंन्टेशन अॅण्ड कंट्रोल इंजि विभागाचे विभाग प्रमुख व तीसगांव प्रवरा येथील स्व.बबनराव कडू पाटील यांचे चिरंजीव प्रा.डॉ.चंद्रकांत कडू पाटील यांना सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठाच्या वतीने दिला जाणारा गुणवंत अध्यापक पुरस्कार नुकताच प्राप्त झाला.

पुणे विदयापीठात झालेल्या कार्यक्रमात सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर व पद्मश्री .डॉ. रविंद्र कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रा.डॉ.कडु यांना पुणे विदयापीठाचे सन्मानचिन्ह देऊन या पुरस्काराने सन्मानित करण्यात आहे.

सदर पुरस्कार त्यांना उच्च शिक्षण, ५९ संशोधानात्मक शोध निबंधाची प्रसिध्दी, चर्चा सत्र, सेमिनार, कॉन्फरन्स यांचे आयोजन व सहभाग तसेच अखिल भारतीय स्तरावरील संस्थाचे सदस्यत्व व त्यांच्या कार्यातील सहभाग ,

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध स्तरांवरच्या पदांवरती निवड व त्यांच्या कार्यातील सहभाग सेवानिषठा आणि इतर बाबींसाठी आणि शिक्षण क्षेत्रातील अमुलाग्र कामगिरीसाठी हा पुरस्कार डॉ. चंद्रकांत कडू यांना प्रदान करण्यात आला.

डॉ. चंद्रकांत कडू यांना गुणवंत अध्यापक पुरस्कार प्राप्त झाल्याने प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे चेअरमन आ.राधाकृष्ण विखे पाटील , जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील,

खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील, माजीमंत्री.आण्णासाहेब म्हस्के पाटील , संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुश्मिता विखे पाटील,

कारखान्याच्या माजी संचालिका श्रीमती. इंदूताई बबनराव कडू आदिंसह संस्थेचे टेक्नीकल डायरेक्टर, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रा.डॉ.चंद्रकांत कडू यांचे अभिवादन केले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24