वनस्पती शास्त्र विषयात प्रा.निशा गोडसे यांना पी.एच.डी पदवी प्राप्त

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- अहमदनगर महाविद्यालयाच्या प्रा.निशा गोडसे यांना वनस्पती शास्त्र विषयात पी.एच.डी पदवी प्राप्त मुंबई विद्यापीठांतर्गत पी.एच.डी संशोधनासाठी दापोली शिक्षण संस्था संचलित दापोली अर्बन बँक सीनियर

सायन्स कॉलेजच्या वनस्पती शास्त्र विभागाच्या सहकार्याने प्रा.निशा गोडसे यांना वनस्पती शास्त्र विषयात औषध उपचारासाठी उपयोगी वांशिक वनस्पतीच्या प्रजातीचे प्रमाणीकरण यावर नुकतीच पी.एच.डी प्राप्त झाली आहे

या संशोधनासाठी मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संदेश जगदाळे (दापोली कॉलेज) यांचे सहकार्य लाभले या संशोधनासाठी प्रा.निशा गोडसे यांनी देशातील वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या वनस्पतीच्या विविध प्रजाती गोळा केल्या व त्यामधील औषधी गुणधर्माचा शोध लावला आहे.

प्रा.निशा गोडसे यांना या संशोधनासाठी अहमदनगर महाविद्यालयाचे प्राचार्य.डॉ.रजनीश बार्नबस डॉ.स्वाती बार्नबस व उपप्राचार्य वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ बी.एम.गायकर व इतर शिक्षकांचेही मार्गदर्शन व सहकार्य लाभले

या संशोधनाच्या यशस्वी ते बद्दल सुनील एम पारधे डॉ.प्राजक्ता पारधे आदीसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करत कौतुक केले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24