Sinhagad : सिंहगडावर या गोष्टीं नेण्यास आणि विक्रीस बंदी; भरावा लागणार दंड

Sinhagad : तुम्ही अनेकवेळा सिंहगडावर गेला असाल किंवा जायचा प्लॅन करत असाल तर तिथे काही नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. गडाचे सौंदर्य राखण्यासाठी वन विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच खाद्यपदार्थांच्या टपऱ्या एकच रांगेत आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

फूड मॉलप्रमाणे या टपऱ्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. तसेच पार्किंगची जागा अडविणाऱ्या टपऱ्याही काढण्यात येणार आहेत. पुढील ४ दिवसात हे अतिक्रमण काढण्यास सांगितले आहे.

७१ टपऱ्यांचे पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे वनाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. वन विभागाचे अधिकारी, वनसंरक्षण समिती आणि घेरा समितीतील गावांतील सरपंचांच्या उपस्थितीत मंगळवारी सिंहगडावर बैठक घेण्यात आली. यावेळी विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली आहे.

Advertisement

पार्किग ची जागा वाढवणार

गडावर असणाऱ्या टपऱ्यांनी पार्किंगचीही जागा काबीज केली आहे. त्यामुळे गडावर गाडी घेऊन जाणाऱ्या अनेक पर्यटकांना घाट माथ्यावर गाडी लावावी लागते. त्यामुळे अनेक पर्यटकांना त्रास होतो. सर्व टपऱ्या एका रांगेत घेतल्याने जागा मोकळी होणार आहे तसेच पार्किंगची जागा वाढणार आहे.

गडावर पॅकिंगचे पदार्थ मिळणार नाहीत

Advertisement

गडावर पर्यटकांच्या मागणीनुसार नूडल्स आणि वेफर्स ची विक्री मोठ्या प्रमाणात केली जात होती. यामुळे प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. हा प्लास्टिक कचरा गडावर कुठेही विखरल्याचे पाहायला मिळत आहे.

त्यामुळे असे पदार्थ विकण्यास आणि नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. पर्यटकांकडे असे पदार्थ सापडल्यास दंड आकारण्यात येणार आहे. तसेच पर्यटक दूध पिशवी आणि प्लास्टिक पाण्याची बाटलीचं गडावर घेऊन जाऊ शकतात.

गावकरी आणि स्टॉलधारकांनी बैठकीत सकारात्मक प्रतिसाद दर्शवला. त्यांना स्टॉल काढण्यासाठी चार दिवसांची मुदत दिली आहे. ७१ स्टॉलधारकांचे आम्ही पुनर्वसन करणार आहोत.

Advertisement

नवीन जागेला कुंपण असून, सगळे स्टॉलधारक एकाच ठिकाणी असतील. परिसराची स्वच्छता झाली असून, जागांची विभागणी करण्याचे काम सुरू आहे.

नवीन वर्षात पर्यटकांना अतिक्रमणमुक्त सिंहगड बघायला मिळेल. असे सिंहगड वन अधिकारी परिमंडळ विभागचे बाळासाहेब लटके यांनी सांगितले आहे.

Advertisement