आठवडी बाजाराचे योग्य नियोजन करणे गरजेचे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2021:-  जिल्ह्यावर कोरोनाचे संकट पुन्हा घोगावु लागल्याने प्रशासन पुन्हा एकदा सतर्क झाले आहे. यातच लग्नसोहळे, कार्यक्रम, आठवडे बाजार या ठिकाणी होणारी गर्दी कोरोना प्रादुर्भावास कारणीभूत ठरत असल्याची दिसून येत आहे.

यामुळे अनेक ठिकाणचे आठवडे बाजार रद्द करण्यात आले आहे. श्रीरामपूर नगरपालिकेने आठवडे बाजाराचे व्यवस्थित नियोजन न केल्यामुळे गर्दी खूप वाढत चाललेली आहे.

त्यामुळे नगरपालिकेने आठवडे बाजार भरविण्याचे नियोजन करावे, अशी मागणी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी केली आहे. सध्या करोनाची परिस्थिती भयंकर बनत चाललेली असून जनतेने सावधगिरीचे उपाय बाळगणे गरजेचे आहे.

वाढत्या गर्दीमुळे कोरोना फोफावतो आहे. या गर्दीमुळे करोना पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही, रस्त्यांवरच बाजार भरत असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.

सध्याची कोरोना ची परिस्थिती बघता नगरपालिकेने आठवडी बाजाराचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे असे उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी सांगितले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24