केडगाव मध्ये पत्रकार व त्याच्या कुटुंबीयांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 6 मे 2021 :-केडगाव मधील पत्रकार व त्याच्या कुटुंबीयांवर हल्ला करणार्‍या आरोपींना तात्काळ अटक करून, पत्रकार संरक्षण कायद्यातंर्गत आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या

मागणीचे निवेदन मराठी पत्रकार परिषदचे नाशिक विभागीय सचिव तथा पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती जिल्हा निमंत्रक मन्सूर शेख यांनी पोलीस अधिक्षक कार्यालयात निवेदन दिले.

एका दैनिकाचे उपसंपादक असलेले मुरलीधर तांबडे व त्यांच्या कुटुंबियांना मारहाण झाली आहे. केडगाव येथे राहत्या घरी असताना

काही किरकोळ कारणावरून सदर भागातील गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी तांबडे यांच्या कुटुंबीयांवर प्राणघातक हल्ला केला. मंगळवार दि.4 मे रोजी सकाळी ही घटना घडली असून,

या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. मात्र यामधील आरोपी अद्यापि फरार आहेत.

कोरोनाच्या संकटकाळात कर्तव्य बजावणार्‍या पत्रकारांवर हल्ले होणे निषेधार्ह बाब आहे. टाळेबंदीत मोकाटपणे पत्रकारांच्या कुटुंबीयांवर हल्ला करणार्‍या सर्व गुंडांना तात्काळ अटक करून

त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करुन, या घटनेचा मराठी पत्रकार परिषद व पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24