अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- विविध शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये होत असलेल्या डॉक्टरांवरील हल्ल्याचा निषेध म्हणून आयएमए या डॉक्टरांच्या संघटनेने शुक्रवारी, १८ जून हा काळा दिवस म्हणून पाळण्यात आला.
डॉक्टरांवरील हल्ले थांबवण्यासाठी कायदा पास करण्यात यावा, सर्व वैद्यकीय आस्थापना या संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करा, रुग्णालयाच्या सुरक्षेचे प्रमाणिकरण करा,
हल्लेखोर व्यक्तींवरील खटले फास्ट ट्रॅक कोर्टात घ्या, अशा मागण्यांचे निवेदन आयएमए श्रीरामपूरच्या वतीने खासदार सदाशिव लोखंडे, प्रांताधिकारी अनिल पवार,
अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ. भूषण देव, उपाध्यक्ष संजय शेळके, सचिव डॉ. सुनील गोराणे, खजिनदार डॉ. समीर बडाख, डॉ. डी. एस. शिरसाट,
डॉ. रवींद्र कुटे, डॉ. संजय अनारसे, डॉ. कांतीलाल मुंदडा, डॉ. सुरेखा जोशी आदी उपस्थित होते. हल्ल्यांच्या निषेधार्थ काळ्या फिती बांधून रुग्णसेवा सुरू ठेवण्यात आली.
गेल्या दीड वर्षामध्ये भारतात आरोग्य यंत्रणांवर, आरोग्य कर्मचाऱ्यांवर जास्त हल्ले व्हायला लागले. महाराष्ट्रात दीड वर्षात १५ घटना घडलेल्या आहेत.