अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :- खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सध्याची कोवीड स्थितीत गरज ओळखून रेमिडीसीवीरचा काळा बाजार होत असल्याचे पाहून त्यांनी स्वतः रेमिडीसीवीर इंजेक्शने खरेदी करून स्वखर्चाने अहमदनगर येथील जिल्हा शासाकिय रूग्णालय, शिर्डी येथील साईबाबा रूग्णालय, प्रवरा मेडीकल ट्रस्टचे रूग्णालय व गरजू रूग्णांना वितरीत केली.
सामान्य जनतेला धीर देण्याचा प्रयत्न केला असताना जनतेला सहाय्य करायचे सोडून स्वतःच्या प्रसिध्दीच्या हव्यासापोटी डॉ. विखे यांच्या विरोधात मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका दाखल करणाऱ्यांचा जाहीर निषेध व्यक्त करून नारायण धोंगडे,
योगेश आहेर, रमेश म्हसे यांसह राहाता व राहुरी तालुक्यातील युवकांनी आज अहमदनगर येथे जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन दिले.
कोवीड रूग्ण मरणाच्या दारात असताना त्यांना रेमीडीसीवीर देवून जीवनदान देण्याचे पुण्यकर्म डॉ. सिजय विखे पाटील यांनी केले आहे. या पुण्यकर्मास ही गालबोट लावणारी, राजकारण करणारी, दुष्ट हेतू बाळगुण त्यांना बदनाम करणारी घटना आहे.
या घटनेमुळे यापुढे कोणीही डॉ. सुजय विखे पाटील यांचेसारखे सहकार्य करण्यास धजावणार नाही अशी प्रतिक्रिया युवकांनी व्यक्त केली.