आरपीआयचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- नगर तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाच्या वतीने राज्य सरकारने पदोन्नती आरक्षण कायम ठेवण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे दरम्यान या निवेदनात म्हंटले आहे कि, पदोन्नतीमध्ये आरक्षण हा मागासवर्गीयांचा हक्क आहे.

सर्वोच्च न्यायालयाने पदोन्नती मध्ये आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने त्वरित घेण्याची प्रमुख मागणी अहमदनगर तालुक्याच्या वतीने महाविकास आघाडी सरकारला करण्यात आली.

तसेच स्वतःला पुरोगामी म्हणणारे सरकार असले तरी पदोन्नती मधील मागासवर्गीयांच्या आरक्षणाचा प्रश्न महाविकास आघाडी सरकार हे मागासवर्गीयांच्या विरोधात सरकार ठरल्याचा आरोप आरपीआयच्या वतीने करण्यात आला आहे.

पदोन्नती आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने त्वरित द्यावा यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर तालुक्याच्या वतीने मागणी करण्यात आली आहे

पदोन्नतीमध्ये आरक्षण हा मागासवर्गीयांचा हक्क आहे जर सरकारने निर्णय न घेतल्यास तीव्र प्रकारचे आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24