अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-ऐतिहासिक वारसा लाभलेले समृद्ध असेलल्या अहमनगर जिल्ह्याच्या कामगिरीत एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे.
नुकतेच प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अहमदनगर जिल्ह्यास भौतिक तपासणी या संवर्गात प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला आहे.
तर अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक लाभार्थी नोंदणी व योजनेचा लाभ देण्याचे काम संगमनेर तालुक्यात झाल्याने संगमनेर तालुका आघाडीवर राहिला असल्याची माहिती तहसिलदार अमोल निकम यांनी दिली.
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या दुसर्या वर्धापन दिनानिमित्त देशभरातील उत्कृष्ट कामगिरी बजावणार्या जिल्ह्यांचा सन्मान होत आहे.
केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांच्या अध्यक्षतेखाली आज बुधवार (दि. 24 फेब्रुवारी) रोजी संपन्न होणार्या कार्यक्रमात हा पुरस्कार वितरण समारंभ होत आहे. जिल्ह्याचा पुरस्कार स्विकारण्यासाठी मा. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
नवी दिल्लीतील एनएएससी कॉम्प्लेक्स, पुसा येथील ए.पी.शिंदे सभागृहात पुरस्कार वितरण समारंभ संपन्न होणार आहे. अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक लाभार्थी नोंदणी व योजनेचा लाभ देण्याचे काम संगमनेर तालुक्यात झाले आहे.
तालुक्यात एकूण नोंदणी झालेले खातेदार 72 हजार 513 असून त्यापैकी 68 हजार 713 खातेदारांना आजपावेतो 7 हप्त्यांचा लाभ देण्यात आलेला आहे. तालुक्यातील लाभार्थ्यांना आजपर्यंत मिळालेली एकूण 77 कोटी 72 लाख 68 हजार आहे.
ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |