अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2021 :- महाराष्ट्रासह देशातील सर्व शेतकऱ्यांनाा शेती कामासाठी आवश्यक अवजारे व शेती आवश्यक पाणी केंद्र व राज्य सरकारने वीज ९० टक्के सवलतीत द्यावे, अशी मागणी अखिल भारतीय शेतकरी विकास संघर्ष समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आायोगाचा पगार दिला जात असून त्यांना आरोग्य सुविधाही दिल्या आहेत. प्रवास, महागाई भत्ताही दिला जातो.
लोकसभेत अन् विधानसभेत आमदार व खासदारांचा पगार, मानधन व सवलतीसाठी एकमुख्याने ठराव मंजूर केला जातो. पण, ग्रामीण भागात जाऊन शेतकऱ्यांचीही आर्थिक स्थिती सरकारने जाऊन पहावी.
शेतमालाला कवडीमोल भाव मिळत आहे. साखर कारखानदार ऊसापासून साखर तयार करतात, परंतु शेतकऱ्याच्या ऊसाला अवघा २ हजार २०० ते २ हजार ५०० भाव दिला जातो.
शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी ट्रॅक्टर, नांगर, बैल, म्हशी, गाई, कुक्कुटपालन, शेळीपालन आदी अवजारे व सिंचन साहित्यावर ९० टक्के सवलत द्यावी, असे पत्रात म्हटले आहे.