अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2021:-संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील घारगाव येथील पोलिस स्टेशनच्या आवारात गेल्या अनेक वर्षांपासून बेवारस पडून असलेल्या (५३) दुचाकींचा जाहीर लिलाव मंगळवार दिनांक ३० मार्च रोजी सकाळी दहा वाजता करण्यात येणार आहे अशी माहिती पोलिस निरीक्षक सुनिल पाटील यांनी दिली आहे.
४६ गावांचा केंद्र बिंदू म्हणून घारगाव पोलिस ठाणे ओळखले जात आहे आजू बाजूच्या गावांमध्ये किंवा पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर सापडलेल्या बेवारस दुचाकी पोलिस स्टेशनच्या आवारात आणून लावल्या जात असतात गेल्या सात ते आठ वर्षांपासून (५३) दुचाकी धूळखात पडून आहे यातील काही दुचाकी खराबही झाल्या आहेत.
या दुचाकींचे मालक एकदाही दुचाकी नेण्यासाठी पोलिस स्टेशनला आले नाही त्यामुळे या सर्व दुचाकींचा जाहीर लिलाव करायचा असून
त्याबाबत घारगाव पोलिसांनी सर्व प्रकारची कायदेशीर पूर्तता करून सर्व दुचाकींचा जाहीर लिलाव करण्याचे नियोजन केले आहे त्यामुळे मंगळवारी बरोबर दहा वाजेच्या सुमारास हा जाहीर लिलाव होणार असल्याचे पोलिस निरीक्षक सुनिल पाटील यांनी सांगितले आहे.