अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:- कोपरगाव तालुक्यातील अनेक दिवसांपासून काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेले काँग्रेसचे कार्यकर्ते यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे.
शहर कार्याध्यक्ष मंगेश देशमुख यांनी शिवसेनेचे उत्तरनगर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली व कलविंदरसिंग दडियाल यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यावेळी मंगेश देशमुख, आकाश जगताप,सागर खांडरे, सोमनाथ वाकडे,दीपक खांडरे,अमोल गुंजाळ,राहुल अग्रवाल,मुकेश ठोंबरे, निलेश पवार,सानी शेलार,एकनाथ भागिले,अरबाज शेख आदी युवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यावेळी शिवसेनेचे शहर संघटक बाळासाहेब साळुंके,उपशहरप्रमुख विकास शर्मा व पिंटू पावशे यांनी सर्व युवकांचा यथोचित सत्कार केला.