राज्यात आज सार्वजनिक सुट्टी; मात्र बँका बाबत RBI ने स्पष्ट केले धोरण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, , 07 फेब्रुवारी 2022 :-   भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने आज सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

यामुळे आज राज्यभरातील शाळा, कॉलेज, सरकारी कार्यालये बंद ठेवण्यात येणार आहेत. एकीकडे हे सगळे बंद असताना परंतू, केंद्राच्या अखत्यारीतील बँका सुरु असतील का याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.

एसबीआय, बँक ऑफ इंडिया सारख्या सरकारी आणि खासगी बँका या केंद्र सरकारच्या म्हणजेच आरबीआयच्या अखत्यारित येतात. यामुळे राज्याने घेतलेले निर्णय त्यांच्यावर लागू होत नाहीत.

केंद्र सरकारने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केलेला असला तरी सार्वजनिक सुटी जाहीर केलेली नाही. म्हणून राज्य सरकारने घेतलेले निर्णय राष्ट्रीय बँकांनाही त्या राज्यापुरते लागू होतात.

यामुळे आज ७ फेब्रुवारी बँका सुरु राहतील की बंद असतील याबाबत लोक प्रश्न विचारत होते. यावर आरबीआयने उत्तर देत लोकांमधील संभ्रम दूर केला आहे.

महाराष्ट्र वगळता देशभरातील बँका आज सुरुच राहणार आहे. फक्त महाराष्ट्रातील बँका, वित्तीय संस्था बंद राहणार असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे. तसेच जे कोणतेही व्यवहार पेंडिंग असतील ते ८ फेब्रुवारीला केले जातील, असेही आरबीआयने म्हटले आहे.