file photo

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- ओबीसी समाजबांधवांना त्यांचे हक्काचे आरक्षण मिळवून देण्यासाठी न्यायालयात अपयशी ठरलेल्या निष्क्रिय सरकाराविरोधात आ. बबनराव पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी श्रीगोंदा यांच्या वतीने आज बुधवार दि. १५ सप्टेंबर 2021 रोजी सकाळी ११.०० वाजता तहसील कार्यालय, श्रीगोंदा येथे महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त करत आंदोलन करण्यात आले.

व आरक्षण जैसे थे न झाल्यास भविष्यात यापेक्षा तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा श्रीगोंदा तालुका भाजपाने दिला. यावेळी उपस्थीत आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन करताना भाजपा अहमदनगर जिल्हा सरचिटणीस तथा श्रीगोंदा-नगर विधानसभा प्रमुख बाळासाहेब महाडीक म्हणाले कि,

महाविकास आघाडी सरकारच्या उदासीनतेमुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. १२ डिसेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला “राज्य मागासवर्गीय आयोगाचे” गठन करावे व राज्यातील ओबीसी समाजाचा ‘Empirical Data’ जमा करून तो तत्काळ न्यायालयास सादर करावा असा आदेश दिला.

परंतु या आदेशाला १८ महिने होऊनही या सरकारने साधे राज्य मागासवर्गीय आयोगाचे गठन देखील केलेले नाही. मुख्यमंत्री ठाकरे साहेबांस विरोधी पक्षनेते माननीय देवेंद्र फडणीस साहेबांच्या तसेच भाजपा ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून पाच सहा वेळा पत्राद्वारे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे गांभीर्य लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला.

परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. १२ डिसेंबर नंतरही माननीय सर्वोच्च न्यायालयाने दहा ते बारा तारखा दिल्या. परंतु एकही तारखेला सरकारकडून कोणीही न्यायालयाने दिलेल्या आदेशांची पुर्तता करून न्यायालयात हजर राहिले नाही. मुख्यमंत्र्यांनी देखील प्रकरणात स्वतः लक्ष घातले नाही.

हि अत्यंत गंभीर बाब आहे. मागासवर्ग आयोगाचे गठन न झाल्यामुळे ओबीसींना अरक्षणापासून मुकावे लागणार आहे, तसेच न्यायालयामध्ये मराठा समाजाची बाजू सक्षमपणे न मांडल्यामुळे मराठा आरक्षण रद्द झाले आहे. या दोन्हीही बाबतीत सरकार अपयशी ठरले आहे.

या हलगर्जीपणाचा परिणाम ओबीसी आरक्षणाशिवाय पाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहिर होण्यात झाला आहे. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात वकिलच उभा केला नाही अस सत्ताधारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणत आहेत. विधी व न्याय खात्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी या आरोपावर खुलासा करावा

असे आमदार बबनराव पाचपुते म्हणाले. ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या आघाडी सरकारचा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने धिक्कार करत आहोत. अशा आशयाचे निवेदन नायब तहसीलदार ढोले म᷃डम यांना देऊन आंदोलनाची सांगता करण्यात आली.

आंदोलनावेळी बाळासाहेब महाडिक, राजेंद्र उकांडे, नितीन नलगे, अशोक ईश्वरे गुरुजी, सुहासिनी गांधी, बापुतात्या गोरे, महेश लांडे, अशोक खेंडके, दिपक शिंदे, शहाजी खेतमाळीस, संतोष क्षिरसागर, सुधीर खेडकर, महावीर पटवा, महेश क्षिरसागर, अनुजा गायकवाड, संतोष मेहेत्रे, ऋषिकेश गोरे, संध्या रसाळ, यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.