अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2022 :- राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियान अंतर्गत रविवार दि. 27 फेब्रुवारी रोजी श्रीरामपूर शहरात 0 ते 5 वयोगटातील 10 हजार 677 बालकांना पोलिओ डोस देण्यात आला आहे.
मोहिमे अंतर्गत रविवारी एका दिवसांत 10,677 बालकांचे आणि पुढील पाच दिवसांत उर्वरित बालकांना घरोघरी जाऊन डोस पाजण्यात येणार असून 100 टक्के पल्स पोलिओ मोहीम कार्यक्रम पूर्ण करणार आहे.
याबाबतची माहिती पंचायत समितीच्या आरोग्य अधिकारी डॉ. राजश्री देशमुख, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. जया छतवाणी व डॉ. संकेत मुंदडा यांनी दिली.
दरम्यान पल्स पोलिओ मोहीम राबविताना श्रीरामपूर शहरात 34 ठिकाणी बुथ उभारण्यात आले होते. नगरपरिषद आरोग्य केंद्रासह शहरातील शाळा, अंगणवाडी, रेल्वे स्टेशन, बस स्टॅण्ड आदी ठिकाणी बुथद्वारे ही मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेचा शुभारंभ सकाळी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, नगरपरिषद श्रीरामपूर येथे झाला. यावेळी प्रांताधिकारी अनिल पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजश्री देशमुख,
नगरपरिषद आरोग्य केंद्राचे डॉ. जया छतवाणी, डॉ. संकेत मुंदडा, अविनाश सलालकर श्रीरामपूर रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. गिडवाणी, सेक्रेटरी हसमुख पद्मानी, संदीप शहा, तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे व उपजिल्हा रुग्णालय श्रीरामपूर येथील कर्मचारी उपस्थित होते.