पुणे विद्यापीठाच्या परीक्षा होणार ऑनलाइन , केव्हापासून असेल परीक्षा वाचा सविस्तर……

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जात आहेत. काही दिवसापासून राज्यातील कोरोनाविषयक परिस्थिती आटोक्यात आली होती.

त्यामुळे कोरोना विषयक नियमांचे पालन करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या परीक्षांना 15 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार असल्याची माहिती आहे. तसेच 20 जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज सादर करण्यास मुदत देण्यात आली आहे.

काही दिवसांपासून विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन होणार यावरुन चर्चा रंगल्या होत्या. आतापर्यंत पुणे, अहमदनगर ,नाशिक जिल्ह्यातील विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयातील 6 लाख 10 हजार 120 विद्यार्थ्यांनी भरले परीक्षांचे अर्ज दाखल केले असून, अखेर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहेत.

विद्यापीठ प्रशासन आता ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी कोणती यंत्रणा वापरणार याकडे देखील लक्ष लागले आहे. विद्यार्थ्यांनी 20 जानेवारीपर्यंत अर्ज सादरक केल्यानंतर विद्यापीठाकडून परीक्षेसंदर्भातील पुढील प्रक्रिया सुरु होणार आहे.

कोरोना विषाणू संसर्गामुळं परीक्षा ऑनलाईन घेण्यात येत आहेत. विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांचा ऑफलाईन परीक्षेसाठी आग्रह होता. कोरोनाविषयक परिस्थिती विचारात घेऊन ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घ्यावी, असे निर्देश राज्य शासनाने मागे दिले होते.

त्यातच विविध विद्यार्थी संघटनांकडून ऑनलाईन परीक्षेची मागणी केली गेली होती. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची परीक्षा ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे.

या परीक्षांना 15 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. आतापर्यंत पुणे,अहमदनगर ,नाशिक जिल्ह्यातील विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयातील 6 लाख 10 हजार 120 विद्यार्थ्यांनी परीक्षांचे अर्ज भरले आहेत, अजूनही 2 लाख 9 हजार विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरणं बाकी असल्याची माहिती आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परीक्षा विभागानं दिलेल्या माहितीनुसार 100 टक्के अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा होणार आहे. 2019 च्या पँटर्ननुसार परीक्षा घेतली जाणार आहे. दोन दिवसापूर्वीपर्यंत ऑनलाईन परीक्षेचं काम कोणत्या एजन्सीला द्यायचे, यावर विद्यापीठाचा अद्याप निर्णय झालेला नाही.

ऑनलाईन परीक्षेसाठी एजन्सी निवडली नसल्याने परीक्षा लांबणीवर पडण्याबाबत चर्चा होत्या. मात्र, विद्यापीठानं परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. गेल्यावर्षी विद्यापीठाच्याच एजन्सीने परीक्षांच काम पाहिले होते कदाचित त्याच एजन्सीकडे काम जाण्याची शक्यता आहे.