अहमदनगर Live24 टीम, 7 ऑगस्ट 2021 :- कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता प्रशासनाने कठोर निर्बंध लागू केले आहे. तसेच वेळेची मर्यादा देखील ठरवून दिली आहे. यातच काही व्यावसायिकांकडून निर्धारित वेळेनंतरही दुकान सुरू ठेवल्याबद्दल सोनई पोलिसांनी अशा आठ दुकानदारावर दंडात्मक कारवाई केली आहे.
करोना विषाणूला रोखण्यासाठी प्रशासनाने सकाळी 8 ते संध्याकाळी 4 पर्यंत दुकाने सुरू ठेवण्याचे निर्देश दिले होते. ज्यामध्ये फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे व पाचहून अधिक व्यक्ती दुकानात न राहणे असे नियम आहेत मात्र ठरविलेल्या वेळेनंतरही दुकान सुरू ठेवल्याबद्दल गुरूवारी 5 ऑगस्ट रोजी सोनई येथील प्रदीप मांगीलाल चंगेडीया,
आकाश कारभारी डफाळ, शरद वसंतलाल चंगेडीया, प्रशांत चांगदेव शिंदे, राहुल शरद तवले, बाळासाहेब रावसाहेब टिक्कल, पांडुरंग कोंडीराम साळवे, कैलास भाऊराव पालवे या आठ व्यापार्यांना करोना संसर्ग संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी सुमारे सात हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांच्या समवेत हवालदार श्री. आव्हाड, पोलीस नाईक बाबा वाघमोडे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल जवरे, कॉन्स्टेबल सुनील ढोले यांनी केली.
दरम्यान शासनाने ठरवून दिलेले नियम पाळणे बंधनकारक असल्याने व सध्या जिल्ह्यात वाढत असलेली करोना रुग्णांची संख्या पाहता जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.