कोरोनाबधितांना गुढीपाडव्यानिमित्त पूरणपोळीच जेवण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2021 :-राज्यात कोरोना आजाराने धुमाकुळ घातला आहे. दिवसागणिक वाढती रूग्णासंख्येमुळे नागरीक भयभीत झालेले आहे.

अनेकांच्या कुटूंबातील काही सदस्य कोविड सेंटरमध्ये तर काही विलगीकरण कक्षात आहे. या परिस्थितीचा परिणाम आजच्या नववर्षारंभदिनी गुढीपाडवा या सणावर दिसुन आला.

अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकेचे संचालक श्री विवेक कोल्हे यांनी आज कोपरगाव येथील कोविड सेंटरला भेट देउन गुढीपाडवा दिनानिमित्त रूग्णांना पुरणपोळीच्या जेवणाचे वाटप केले.

यावेळी कोविड रुग्णांशी विवेक कोल्हे यांनी संवाद साधत कोरोनाबाधित रूग्णांना येत असलेल्या अडचणी समजून घेतल्या.

कमी पडत असलेले औषधे, सिलेंडर आणि आॅक्सीजन मशीनची गरज लक्षात घेउन तातडीने कोविड सेंटरला सिलेंडरसह आॅक्सीजन मशीन व औषधे उपलब्ध करून दिले.

यावेळी श्री कोल्हे म्हणाले, आज देशात संकटजन्य परिस्थिती निर्माण झाली असुन महाराष्ट्रात रूग्णांची संख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडला आहे.

कोपरगाव तालुक्यातही रूग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे या संकटाला आपल्यासर्वांना एकजुटीने सामोरे जायचे आहे. आपण सर्व एका कुटूंबातील असुन घाबरून न जाता या संकटाचा मुकाबला करायचा आहे.

रूग्णांना  समस्यांची विचारपूस करत, आपण सर्वजण मिळून यातून लवकरच बाहेर पडू, असा धीर दिला.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24