अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. मात्र लसीकरण मोहीम दरम्यान एक धक्कादायक प्रकार नगर तालुक्यात घडला आहे.
लसीकरण सुरू असताना काही व्यक्तींनी आरोग्य कर्मचार्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याची घटना निंबळक येथील आरोग्य केंद्रावर घडली आहे.
एकीकडे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहे. लसीकरण राबविले जात आहे. पण अशा घटनांमुळे नागरिकांना शासनाच्या सेवापासून वांछीर्ट राहावे लागते. तसेच याचाच परिणाम म्हणजे बाधितांच्या संख्येत वाढ होते आहे.
दरम्यान आरोग्य केंद्रावरील गोंधळ प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघांविरूद्ध सरकरी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आरोग्य केंद्राच्या समुदाय आरोग्य अधिकारी रूपाली शंकर मोहकर यांनी फिर्याद दिली आहे.
राजेंद्र पोपट कोतकर, गोरक्ष मुरलीधर कोतकर, दत्तु गुलाब कोतकर, सुरेश बाबु कोतकर (सर्व रा. निंबळक ता. नगर) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पसार झाले असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक रवाना झाले आहे.