ताज्या बातम्या

बॉक्स ऑफिसवर ‘पुष्पा’ चा डंका; कमाईचे आकडे ऐकून व्हाल थकीत

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :-  अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ चित्रपट 17 डिसेंबर 2021 रोजी चित्रपटगृहामध्ये रिलीज झाला होता. अजूनही या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी हिंदीत 3 कोटींचा व्यवसाय केला आहे.

सध्या जगभरात हा चित्रपट 300 कोटींची कमाई करून या वर्षातील सर्वात यशस्वी चित्रपट ठरला आहे. दरम्यान ‘पुष्पा’ या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई सुरूच आहे.

या चित्रपटाने दक्षिणेत धमाकेदार सुरुवात केली आणि एका आठवड्यात जवळपास 165 कोटींची कमाई केली. याने आता हिंदी भाषिक प्रेक्षकांनाही आकर्षित करण्यास सुरुवात केली आहे.

पुष्पा 2021 मधील भारतातील सर्वात मोठा चित्रपट असल्याचे सिद्ध झाले आहे. या चित्रपटाने जगभरात 300 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने देशभरातील भारतीय बॉक्स ऑफिसवर सुमारे 200 कोटींची कमाई केली आहे.

दक्षिणेत त्याच्या कमाईचे आकडे सतत वाढत आहेत. पुष्पाने हिंदीत दोन आठवड्यांत सुमारे 47 कोटींचा व्यवसाय केला, तर तिसऱ्या वीकेंडच्या पहिल्या दिवशी या चित्रपटाने 3.50 कोटी रुपये कमावले आणि येत्या आठवड्यात त्याची कमाई आणखी वाढणार असल्याचे सांगितले. या चित्रपटाने आतापर्यंत हिंदी भाषेत 50.59 कोटींची कमाई केली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office