सर्व आमदारांना मेंटल हॉस्पिटलला टाका !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:-  मराठा आरक्षणाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केंद्र सरकारवर ढकलू नये. मराठा आरक्षणासाठी राज्य शासनाने काय केले ते आधी कळू द्या. याबाबत राज्य शासनाने आता श्वेतपत्रिका काढावी.

मराठा आरक्षणाबाबत राज्य शासन काहीच बोलत नाही. त्यामुळे या सगळ्यांना मूकबधिरांच्या शाळेत घाला, नको तिथेही नको., मेंटल हॉस्पिटलमध्ये टाकून द्या, असा घणाघात भाजपचे खा. उदयनराजे भोसले यांनी केला.

मराठा आरक्षणासाठी आम्ही सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी बैठकही घेतली. पण त्यासाठी राज्यातील सत्ताधारी आले नाहीत. त्यामुळे ज्या लोकांनी मतदान केले ते त्यांना जागा दाखवतील.

मराठा आरक्षणाबाबत कोणी नेतृत्व करायचे म्हटले की, खा. उदयनराजे भोसले यांचे नाव येते. तुम्हाला वाटते का यातून आरक्षण प्रश्नावर मार्ग निघेल, या प्रश्नावर ते म्हणाले,

मराठा आरक्षणासाठी रक्तपात हाच एक मार्ग आहे आणि तो होणारच. कारण सर्वत्र बेकारी वाढणार आहे. त्यामुळे अशा सर्व गोष्टी होणारच आहेत. त्यावेळी पोलीसही काही करू शकणार नाहीत.

मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने खा. उदयनराजे भोसले हे सातत्याने राजकीय गाठीभेटी घेत आहेत. त्याच्यावर कोणताच ठोसपणे मार्ग निघत नाही. त्यामुळे बुधवारी मुंबई येथे त्यांनी विष पिऊन जीव देण्याची वेळ आली आहे, असे वक्तव्य केले होते.

याच विषयाचा मुद्दा पुढे करत गुरुवारी सातारा येथे आल्यानंतर जलमंदिर पॅलेस येथील निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधताना आपली मते पुन्हा रोखठोक व्यक्त केली.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24