अहमदनगर Live24 टीम, 19 ऑगस्ट 2021 :- सुप्रीम कोर्टानं बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली आहे. मात्र, ती बंदी झुगारून बैलगाडा शर्यत घेण्याचा इशारा भाजप आमदार गोपीचंद पडाळकर यांनी दिला आहे. बैलगाडा शर्यतीवरुन आता राज्यातलं राजकारण तापू लागलंय.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी २० ऑगस्ट म्हणजेच उद्या सांगलीतल्या झरे येथे बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलंय. शर्यतीच्या पार्श्वभूमीवर आटपाडी तालुक्यातील नऊ गावात २ दिवस संचारबंदी लागू केलीय.
तसंच शर्यत स्थानवर नाकाबंदी लावलीय. कोणत्याही परिस्थितीत बैलगाडी शर्यत होणार नाही याची खबरदारी पोलिसांकडून घेतली जातेय भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी बैलगाडा शर्यत आयोजित केली आहे.
सुप्रीम कोर्टानं बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली आहे. मात्र, ही बंदी झुगारून गनिमी काव्यानं बैलगाडा शर्यत घेण्याचा इशारा पडळकर यांनी दिला आहे. पडळकरांच्या हट्टामुळं जिल्हा प्रशासन कामाला लागलं आहे.
आटपाडी तालुक्यातील झरे गावाला छावणीचं स्वरूप आलं आहे. तर आजूबाजूच्या नऊ गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. प्रत्येक रस्त्यावर नाकाबंदी सुरू आहे.
बैलगाडा शर्यतीच्या मैदानात पोलिसांनी चरी पाडल्यात.मात्र या साऱ्या बंदोबस्ताला झुगारून बैलगाडा शर्यत होणारच, असा निर्धार पडळकरांनी केला आहे.
तसेच या पार्श्वभूमीवर माजी कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारला इशारा दिलाय. आमदार गोपीचंद पडळकर यांना अटक करुनच दाखवा, आमच्यात काय हिंमत आहे ते तुम्हाला दाखवू, असा इशारा खोत यांनी दिला आहे.