मराठा आरक्षणा संदर्भात राधाकृष्ण विखे पाटलांनी भूमिका स्पष्ट केली, म्हणाले…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राज्यात राजकारण तापायला सुरुवात झाले आहे. यातच नेतेमंडळींकडून या प्रश्नी गाठीभेटी सुरु झाल्या आहेत.

मात्र अद्याप भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही आहे. यातच आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

आरक्षणाच्या संदर्भात मराठा समाज जी भूमिका घेईल त्याला पक्षीय भूमिका आड येवू न देता आमचा पाठिंबा असेल अशी ग्वाही भाजपाचे नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा समाजातील संघटनाच्या प्रतिनिधीशी संवाद साधताना दिली.

आरक्षणाच्या संदर्भात भाजपच्या वतीने मराठा आंदोलनातील सहभागी संघटनांच्या प्रतिनिधीशी तसेच समाजीतील सर्वच घटकांशी संवाद साधण्यात येत आहे.

आ.विखे पाटील यांच्याकडे नगर आणि नाशिक जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात आली असल्याने आ.विखे पाटील यांनी शेवगाव पासून या दौऱ्याला प्रारंभ केला.

विखे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाच्या संदर्भात दिलेल्या निकालानंतर मराठा समाजात मोठ्या प्रमाणात अस्वस्थता आहे. आघाडी सरकार अद्याप ठोस आशी कोणतीही भूमिका घ्यायला तयार नाही.

त्यामुळेच आरक्षणाच्या मागणीसाठी पुढे काय करता येईल हे जाणून घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले.

अहमदनगर लाईव्ह 24