Sanjay Raut : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी फोन केला असल्याचे ट्विट केले आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेचा काल महाराष्ट्रातील शेवटचा दिवस होता. राहुल गांधी यांनी २ दिवसांपूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वक्तव्य केल्याने शिवसेनेतील नेते नाराज झाल्याचे दिसत होते.
मात्र आता राहुल गांधी त्यांनी संजय राऊत यांना फोन केल्यानंतर शिवसेना आणि काँग्रेसचं नातं किती घट्ट झाले आहे हे दिसून येत आहे. संजय राऊत यांना पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने अटक केली होती.
संजय राऊत यांना १०२ दिवसानंतर कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे संजय राऊत बाहेर आले आहेत. बाहेर येताच संजय राऊत यांनी शिंदे गट आणि भाजपवर सडकून टीका करण्यास सुरुवात केली आहे.
संजय राऊत हे ट्विट करत म्हणाले आहेत की, “भारत जोडोत व्यस्त असुनही राहुल यांनी रात्री फोन करुन माझ्या प्रकृतीची विचारपूस केली. आम्हाला तुमची चिंता होती. असे म्हणाले.
राजकारणातील सहकाऱ्यास खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात 110 दिवस यातना दिल्या याचे दू:ख वाटणे हीच माणुसकी आहे. हा ओलावा संपला आहे.यात्रेत तो दिसतोय…” अशा आशयाचे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.