वारंवार होणाऱ्या पाणी गळतीमुळे राहुरीकर त्रस्त; पाण्यासाठी होतेय भटकंती

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- जिल्ह्यात मागील वर्षी चांगले पर्जन्यमान झाल्याने जिल्ह्यातील धरणे, तलाव, नद्या हे तुडुंब भरून वाहिल्या. एवढे असतानाही आजही जिल्ह्यात अनेक ठिकाणी नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.

अशीच काहीशी घटना राहुरी तालुक्यात घडलेली दिसून येत आहे. राहुरी तालुक्यातील मुळा धरणातून चौदा गावची पाणी योजना गेल्या चार दिवसापासून बंद आहे. त्यामुळे 14 गावातील महिलांना भर पावसाळ्यात हंडाभर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.

ही पाणीयोजना बारागाव नांदूर, केंदळ, पिंपरी, चंडकापूर, मानोरी, वळण, मानोरी यासह 14 गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करते. दरम्यान तालुक्यातील पाणीयोजना सतत बंद पडते त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकण्याची वेळ आली आहे.

तसेच ही पाईपलाईन खराब होऊन तिला कायम गळती लागते. या पाईपलाईनची कायमस्वरूपी दुरूस्ती करून तिला गळती लागणार नाही, याची व्यवस्था करावी, अशी मागणी महिला वर्गातून होत आहे.

तसेच हा एक स्रोत आहे मात्र याला येणाऱ्या अडचणी पाहता या योजनेला पर्याय म्हणून गावात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी 14 गावातील महिला वर्गातून होत आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24