अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2021 :- कोरोना महामारीची साखळी तोडण्यासाठी आणि या महामारीला आळा घालण्यासाठी राहुरी शहरासह तालुक्यात लाॅकडाऊन करण्यात आले.
मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला डावलून ग्रामीण भागात आठवडे बाजार भरतच आहेत. लाॅकडाऊन नंतर आता शहरात रोजच बाजार भरत आहे. त्यामुळे प्रचंड गर्दी होत आहे. याच कारणांमुळे तालूक्यातील कोरोना बाधीतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.
शहरात फक्त नावापूरतेच लाॅकडाऊन असून चोरून लपून सर्वच व्यवसाय सुरू आहेत. पोलिस, महसूल व नगरपरिषद प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत. त्यामुळे तालूक्यात कोरोना बाधीतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.
जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांचे आदेश धुडकावून लावत राहुरी शहरात सकाळी सात वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत प्रचंड गर्दी असते. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानूसार फक्त अत्यावश्यक सेवांना काही काळ परवानगी देण्यात आली.
शहरातील नवीपेठ भागात सर्वच व्यावसायिक आपले दुकाने लावत आहेत. छोटे व्यापारी आपली दुकाने बंद ठेवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करुन कोरोना महामारीला आळा घालण्यास मदत करत आहेत.
मात्र मोठे दुकानदार दिवसभर चोरून लपून दुकानचे शटर बंद ठेऊन व्यवसाय करत आहेत. काही ठिकाणी अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली दारू विक्री होत आहे. या कारणांमुळेच तालूक्यातील कोरोना बाधीतांचा आकडा वाढत आहे.