राहुरीची माहेवाशीन तुळजाभवानीची पालखी तुळजापूरला रवाना

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- अवघ्या महाराष्ट्राचे अराध्य दैवत, आदिशक्ती अर्थात राहुरीची माहेरवाशीन आई तुळजाभवानी देवीची पालखी दिनांक २१ सप्टेंबर रोजी अरूणसाहेब तनपूरे यांनी सपत्नीक आरती केली.

त्यानंतर पालखीला पुष्पहारांनी सजवलेल्या वाहनातून पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार तुळजापुरकडे रवाना करण्यात आले. सालाबाद प्रमाणे काही दिवसांपूर्वी पालखीचा दांडा तुळजापुर येथून राहुरी येथे आला.

त्यानंतर राहुरी येथील मानकरी असलेले लोहार, सुतार समाजाच्या लोकांनी पाळणा तयार करून पालखी तयार केली. कोरोना महामारीमुळे आदल्या दिवशी होणारा छबीना सलग दुसर्‍या वर्षी रद्द करण्यात आला होता.

मात्र आज २१ सप्टेंबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुणसाहेब तनपूरे व सौ. सुजाताताई तनपूरे, माजी नगराध्यक्षा उषाताई तनपूरे व सौ. सोनालीताई तनपूरे यांनी राहुरी येथील तुळजाभवानी देवीच्या माहेर असलेल्या मंदिरात विधीवत मनोभावे आरती केली.

तसेच कोरोना महामारीचा नायनाट होऊन सर्वांना आरोग्य व सुख शांती मिळो. अशी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना केली. त्यानंतर शहरातील श्रीरामदत्त मित्र मंडळ, शिवाजी चौक मित्र मंडळातील कार्यकर्त्यांनी तसेच इतर भक्तांनी कोरोनाची भिती न बाळगता पालखीला डोक्यावर व खांद्यावर घेऊन खेळवीले.

दरम्यान आरतीचे मानकरी असलेले अण्णापाटील शेटे व सुरेशदादा धोत्रे यांच्या घरासमोर आरती करून साडी, चोळी व बांगड्यांनी आईची ओटी भरण्यात आली. यावेळी भंडाऱ्याची उधळण करण्यात आली.

तर आई राजा उदो उदो चा जयघोषाने परिसर दणाणून गेला होता. शेकडो भावीकांनी पालखीचे भक्ती भावाने दर्शन घेतले. यावेळी नगराध्यक्ष अनिल कासार, माजी नगराध्यक्ष ताराचंद तनपूरे,

दशरथ पोपळघट, अरूण ठोकळे, पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे, पत्रकार राजेंद्र वाडेकर, सुनिल भूजाडी, ॲड. राहुल भैय्या शेटे, नरेंद्र शिंदे, संजय पन्हाळे, राहूकाका तनपूरे, ओंकार कासार, संदिप सोनवणे, स्वप्नील भालेकर, संतोष नागरे, अर्जुन बुऱ्हाडे, सुनिल पवार आदि उपस्थित होते.

Ahmednagarlive24 Office