अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :-जिल्ह्यात कोरोनामुळे नागरिक चांगलेच धास्तावले आहे. रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी एकीकडे काही कर्तव्यनिष्ठ डॉक्टर प्राणपणाला लावत आहे.
तर दुसरीकडे डॉक्टरांच्या या कार्याला काळिमा फासणारी घटना राहुरीतील एका माणुसकीहीन डॉक्टरने केली आहे. यामुळे राहुरीमधील नागरिकनांमध्ये एकच संतापाची लाट उसळली आहे.
चक्क प्रसुतीसाठी आलेल्या एका गर्भवतीला करोना नसतानाही तिचा अहवाल पॅाझिटिव्ह देत तिच्यावर उपचार करण्यास राहुरी येथील एका डॉक्टरने नकार दिला. त्यामुळे त्या गर्भवती महिलेसह तिच्या पित्याला मोठा त्रास सहन करावा लागला.
याबाबत अधिक माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील एका शेतकर्याची मुलगी हि प्रेग्नेंट होती. तिची ट्रीटमेंट हि राहुरी शहरातील पाण्याच्या टाकीजवळ असणार्या डॉक्टरकडे सुरु होती.
गर्भवती महिलेची प्रसुतीची तारीख आली असल्याने व तिला मध्यरात्री पोटात दुखू लागल्याने तिने वडिलांबरोबर दुचाकीवर डॉक्टरकडे गेली. तेथे डॉक्टर उपस्थित नसल्याचे तेथील परिचारिकेने सांगून या गरोदर महिलेची स्वतःच्या हाताने स्वॅब घेऊन करोना चाचणी केली. ही चाचणी देखील निगेटिव्ह आली.
मात्र, त्या महिलेला पॉझिटिव्ह चाचणी आल्याचे सांगितले गेले. डॉक्टर येथे दाखल करून घेणार नाही, तुम्ही तिला नगर येथे घेऊन जाण्याचा सल्ला दिला.
त्या गर्भवती महिलेला प्रचंड प्रसुती कळा होत असतानाही हा निष्काळजीपणाचा प्रकार घडला. त्यानंतर त्या शेतकर्याने आपल्या गर्भवती मुलीला दुचाकीवर मध्यरात्री उंबरे येथील सरकारी दवाखान्यात नेले.
तेथेही विजेअभावी उपचार झाले नाही, अखेर दुसरा दिवस उजाडला, मुलीच्या वडिलांनी थेट दुसऱ्या दिवशी मुलीला राहुरीत आणले आणि एका प्रसुती गृहात या महिलेची प्रसुती केली. रात्रभर एका गर्भवतीची अशी हेळसांड करणाऱ्या निर्लज्ज डॉक्टरावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.