राहुरीत कोरोनाचा हाहाकार; प्रशासनाची डोकेदुखी वाढली

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:-गेल्या वर्षभरापासून करोना महामारीचे संकट देशभरात थैमान घालत आहे. करोना कमी होईल ही अपेक्षा असतांना आता पुन्हा करोनाने डोके वर काढले आहे. नुकतेच जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात कोरोनाने कहर केला आहे.

राहुरी तालुक्यात करोनाचा विस्फोट होऊ लागला आहे. गेल्या 24 तासात 40 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नागरिकांसह प्रशासनाचेही धाबे दणाणले आहेत.

तालुक्यात महसूल व आरोग्य प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे करोनाबाधितांची संख्या वाढू लागली असून जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाची तालुक्यात पायमल्ली होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

फेब्रुवारीनंतर वाढत कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता विनाकारण घराबाहेर पडणे टाळा, कुठेही जास्त गर्दी करू नका, काही लक्षणे असल्यास तातडीने जवळच्या वैद्यकीय रुग्णालयांमध्ये तपासणी करून घ्या शासनाच्या नियमांचे पालन करा असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24