अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- राहुरी शहरातील तनपुरे वाडी रोड परिसरातील गिरगुणे मळा येथील शिव चिदंबर मंदिर येथे राज्याचे ऊर्जाराज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवार 12 सप्टेंबर रोजी पेढेतूला करण्यात आली.
शिवचिदंबर मंदिरात वजन काट्याच्या एका बाजूला ना.प्राजक्त तनपुरे तर दुसऱ्या बाजूत ना. तनपुरे यांच्या वजनाइतके पेढे ठेऊन पेढेतूला करण्यात आली.
यावेळी सौ.सोनाली तनपुरे, ताराचंद तनपुरे, हिराचंद तनपुरे, नगराध्यक्ष अनिल कासार, नगरसेवक नंदकुमार तनपुरे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष संतोष आघाव महेश उदावंत ,अशोक कदम, प्रवीण कदम ,
संतोष तनपुरे, रवींद्र तनपुरे, सचिन तनपुरे,मदन तनपुरे ,गौरव तनपुरे ,वैभव थोरात ,अभिजीत तनपुरे ,वैभव गिरगुणे, शेखर सुडके संजय जाधव सर्व नगरसेवक तसेच कार्यकर्ते व परिसरातील नागरिक उपस्थित होते.