अवैध दारूवर छापा, २० हजारांची दारू जप्त

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :-    बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बेलवंडी पोलिसांच्या पथकाने विसापूर येथे दोन ठिकाणी सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीच्या ठिकाणी छापा टाकून सुमारे २० हजार ३०० रुपये किंमतीची दारू जप्त केली.

यावेळी दोन जणांना ताब्यात घेऊन पोलिस कॉन्स्टेबल संपत गुंड आणि पोलिस नाईक ज्ञानेश्वर रावसाहेब पठारे यांच्या फिर्यादीवरून संजय गोपीचंद गजवाणी, विजय सुरेश शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल केला.

विसापूर येथील रेल्वे स्टेशन जवळील टपरीमध्ये आणि चांभुर्डी रस्त्यावरील सबस्टेशन जवळ देशी-विदेशी दारू असल्याची माहिती मिळाली.

यावरून पोलिस हेडकॉन्स्टेबल हसन शेख, पोलिस नाईक संतोष गोमसाळे, पोलिस नाईक ज्ञानेश्वर पठारे, पोलिस कॉन्स्टेबल गुंड,

सोनवणे, महिला पोलिस कॉन्स्टेबल अविंदा जाधव, होमगार्ड सचिन काळाणे यांनी त्याठिकाणी छापा टाकला. २० हजार ३०० रुपयांची दारू जप्त केली.

अहमदनगर लाईव्ह 24