अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात लॉकडाउन घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे जवळपास सर्वच उद्योग व्यवसाय बंद असल्याने अनेकांच्या हाताला काम नसल्याने ते जुगारासारख्या अवैध व्यवसायाकडे वळले आहेत.
मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे एका जुगार अड्ड्यावर छापा टाकून पाच जुगाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.
त्यांच्याकडून पाच हजार रुपये रोख व जुगार खेळण्याचे साहित्य जप्त केले. राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे एका शेडमध्ये अनेक दिवसांपासून अड्डा सुरू होता.
याची खबर मिळताच अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अचानक छापा टाकला. यावेळी काही जुगारी गोलाकार बसून तिरट नावाचा हार जीतचा जुगार खेळताना रंगेहाथ पकडले.
त्यांच्याकडून ४ हजार ९९० रुपये रोख रक्कम व तिरटचे साहित्य ताब्यात घेतले. याप्रकरणी अंकुश गंगाधर मकासरे, राहुल विठ्ठल धनवडे, विकास नारायण कुसमुडे, राजेंद्र पांडुरंग व्यवहारे, अमोल प्रभाकर कुसमुडे या पाच जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.