अहमदनगर Live24 टीम, 2 जुलै 2021 :- जामखेड येथील सदाफुलेवस्ती वरील एका विरोधात अवैध सावकारी करत असल्याची तक्रार जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थाच्याकडे दाखल झाली होती. त्यानूसार बुधवारी सहकार खात्याने संबंधिताच्या घरावर छापा टाकला.
जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी महाराष्ट्र सावकारी अधिनियमानुसार जामखेडचे सहायक निबंधकांना तसे आदेश दिले होते. त्यानुसार सहायक निबंधक देविदास घोडेचोर यांनी ‘त्या’ अवैध सावकाराच्या घराची झडती घेण्यासाठी पथक नेमले.
या पथकासोबत पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या घोडेचोर यांनी पंचासह धाड टाकुन झडती घेतली. या झडतीमध्ये कोरे चेक, कोरे बाँड, विसार पावती असे अनेक संशयास्पद कागदपत्रे आढळुन आली आहेत.
ही कागदपत्रे पुढील कार्यवाहीसाठी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, जामखेड यांच्या कार्यालयात सादर करण्यात आली आहेत. सापडलेल्या कागदपत्रांची पडताळणी करुन अवैध सावकारा विरुध्द महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम नुसार कारवाई करण्यात येणार आहे.
यापुढे जिल्हयातील अवैध सावकारांच्या जाचास त्रस्त व पिडीत नागरीकांनी स्व:हन पुढे येवुन सहकार विभागाकडे पुराव्यासह तक्रार नोंदवावी.
या तक्रार बाबत अर्जदार यांनी गोपनियता बाळगण्यात येवून अवैध सावकार कायद्यानूसार कारवाई करण्याचा इशारा जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी दिला आहे.