हॉटेलवर छापा, दारू पकडली ; ‘या’ गावच्या सरपंचावर गुन्हा दाखल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :- तांभेरे गावचे शिवारात हाॅटेल समृद्धीचे काँउटरमधे छापा टाकून पोलिसांनी 416 रुपये किमतीची 8 देशी दारुच्या सिलबंद बाटल्या जप्त केल्या.

याप्रकरणी तांभेरेचे सरपंच व अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची हकिगत अशी की, तांभेरेचे सरपंच नितीन गागरे यांचे हॉटेल समृद्धी आहे,

यात काल रात्री पोलिसांनी छापा टाकला व मुद्देमाल हस्तगत केला, यावेळी आरोपीकडे विनापरवाना बेकायदा स्वतःचे फायद्याकरीता देशी दारुच्या सिलबंद बाटल्या स्वताचे कब्जात विक्री करण्याचे उद्देशाने बाळगताना मिळुन आला.

आरोपीने त्याच्या कब्जातील 5 सिलबंद बाटल्या जप्त होवू नये म्हणून खाली टाकून फोडल्या आहे . वगैरे म च्या फिर्यादीवरुन पोलिसांनी अमोल पोपट मुसमाडे वय 29 वर्षे 2) नितीन सोन्याबापू गागरे ( फरार ) दोघे रा.तांभेरे यापो स्टे गुन्हा रजि दाखल करण्यात आला आहे.

पोसई मधुकर शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.तपासी अंमलदार पो.ना. विठ्ठल राठोड हे पुढील तपास करीत आहे।

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24